Home आरोग्य रोटरी इस्टतर्फे मोफत प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी शिबिर

रोटरी इस्टतर्फे मोफत प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी शिबिर

0
40

जळगाव प्रतिनिधी । येथील रोटरी इस्टतर्फे २ व ३ फेब्रुवारी रोजी मोफत प्लास्टीक व कॉस्मेटिक सर्जरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

रोटरी इस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून खापरखेडा येथील गंगाराम केशव पाटील यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लकी टेलर यांनी याला विशेष सहकार्य केले आहे. या पत्रकार परिषदेला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे आणि रोटरी ईस्टचे रजनीश लाहोटी हे उपस्थित होते. याशिबिरामध्ये विख्यात सर्जन डॉ. पंकज जिंदल आणि डॉ. शंकर सुब्रमण्यम हे शस्त्रक्रिया करणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound