Home Cities यावल डॉ कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी...

डॉ कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिर


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाची राज्यातील गरजु महिलांना आर्थिकदृष्टया स्वालंबी व आत्मनिर्भर करणारी ही योजना असुन, या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमाह१५०० रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असुन या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ५ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट या दोन दिवस मोफत नांव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात महायुती शासनाच्या वतीने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असुन ,या योजने अंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटीच्या वर असलेल्या लाडक्या बहीणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे . दरम्यान सदरचे अर्ज भरण्यासाठी महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन , यावल येथील डॉ . कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराच्या वतीने येत्या ५ ऑगस्ट सोमवार व ९ ऑगस्ट शुक्रवार रोजी या दोन दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोफत अर्ज भरण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाईन आपल्या नांवाची नोंदणी करण्यासाठी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी १५ वर्षापासुन पुर्वीचे लाभार्थीचे नांव असलेले रेशनकार्ड , मतदार कार्ड किंवा जन्माचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला या कागद पत्रांसह दिनांक ५ ऑगस्ट आणी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०ते ५ वाजे पर्यंत यावल येथील डॉ कुंदन सुधाकर फेगडे यांचे संपर्क कार्यालय , आई हॉस्पीटलच्या शेजारी , भुसावळ रोड यावल येथे उपस्थित राहावे असे आवाहन डॉ .कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .


Protected Content

Play sound