यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सुलवाडी ते ओंकारेश्वर भव्य कावड यात्रेतील भक्तांना आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा समाजसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या वतीने मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
भोकरी तालुका रावेर जवळ असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी श्री क्षेत्र सुलवाडी ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर पर्यत भव्य कावड यात्रा काढण्यात येते.
या यात्रेची रविवार रोजी सायंकाळी समाप्ती झाली. या यात्रेत सहभागी झालेल्या भक्ताना यात्रेत येताना प्रवासात शरीराला काही दुखापत झाली किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत अश्या भक्ताची आश्रय फौंडेशन चे अध्यक्ष व यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी कावड यात्रेत सहभागी भक्तांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्कतेनुसार औषध वाटप केली.
तसेच श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. या वेळी कावड यात्रेत पाई यात्रेत आलेल्या भक्ताचे डॉ. कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांचे कावड यात्रा आयोजकांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले