फेगडे दाम्पत्याच्या वतीने महिलांना मोफत मनुदेवी दर्शनाची सुविधा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या पार्श्वभूमिवर डॉ. कुंदन फेगडे व डॉ. जागृती फेगडे यांच्या वतीने भाविकांना सातपुडा निवासिनी माता मनुदेवीच्या मोफत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे व त्यांच्या सौभाग्यवती डॉ. जागृती फेगडे यांच्या माध्यमातून यावल व रावेर तालुक्यातील भाविकांना मोफत मनुदेवी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगाने रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रावेर बस स्थानकावरून सकाळी साडेदहा वाजता तर यावल बस स्थानकावरून दुपारी बारा वाजता बस निघणार आहे. यासाठी महिला भाविकांनी अधिकाधिक संख्येने याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. जागृती कुंदन फेगडे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी यावल तालुक्यासाठी उज्वल कानडे 91583 25143 रावेर तालुक्यासाठी राम शिंदे 88886 55300 यांच्याशी संपर्क साधावा.

Protected Content