जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथे उद्या मोफत कायदा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालय यांच्या विधी चिकित्सा विभागातर्फे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी कायदा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्ष म्हणून खान्देश एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ऍड प्रमोद एन. पाटील जळगाव हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. युवाकुमार रेड्डी, प्रा. डॉ योगेश महाजन व इतर प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थी पथनाट्य व भाषणांनी शिरसोली गावातील ग्रामस्थांना कायदे विषयक मोफत माहीत देणार आहेत. सदर समस्त शिरसोलीवासीयांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एस एस मणियार विधी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.