जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगर कॉलनीत इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि जनमत प्रतिष्ठानच्या वतीने मोफत कोवीड-१९ तपासणी शिबीर घेण्यात आले.
कोवीड तपासणी शिबीराचे उद्घाटन मुक्ताई महिला संस्थेच्या अध्यक्ष व नगरसेविका नीताताई मंगलसिंग सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आला. आयोजित शिबीरात दीडशेहून अधिक नागरीकांना तपासणी करून घेतली. दरम्यान, पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी विश्वास पवार हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मुक्ताईनगर कॉलनीतील नागरीकांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विवेक सोनवणे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे, दिनेश तेजी, पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील, अंबुबाई शांताराम पाटील, शांताराम पाटील, सागर कोळी, राजेंद्र कुमार, वर्मा सर, संजयकुमार सिंग, आर.सी. पाटील, राहुल निकम, विजय सोनवणे, हेमंत वैद्य, राहुल लोखंडे, गणेश फेगडे, शक्ती महाजन, अनुजा निकम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.