चोपडा, प्रतिनिधी | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निमगव्हाण गावातील महिला व युवतींसाठी तापी फाऊंडेशन, निमगव्हाण (ता.चोपडा) व श्री.नृसिंह हॉस्पिटल प्रा.लि.,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन श्री.नृसिंह हॉस्पिटलचे संचालक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.दिलीप पाटील व सरपंच मंगला कैलास पाटील यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. सदर शिबिरात डॉ.दिलीप पाटील व डॉ.अशोक कदम यांनी ७८ गरजू रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वितरीत केली. तपासणी कामी डॉ. शोएब शेख, आरोग्यमित्र वैभव पाटील, भुषण चौधरी, नर्स लिना बडगूजर, हीना तडवी, गुड्डू शेख यांचे सहकार्य लाभले.शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांमधील सहा रुग्णांवर पुढील उपचार योजनेंतर्गत श्री.नृसिंह हॉस्पिटल प्रा.लि.,चोपडा येथे मोफत केले जाणार आहेत.
यावेळी उपसरपंच ज्योती अशोक कोळी, ग्रामविकास अधिकारी कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गोरख पाटील प्राथमिक शिक्षिका उज्वला जोशी, डॉ.ज्ञानेश्वर पाटील (निमगव्हाण) आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.दिलीप पाटील यांनी आपल्या मनोगतातून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश झोत टाकून त्यांचे विचार महिलांनी आत्मसात करावेत, असे आवाहन उपस्थित महिलांना केले. तसेच गाव व परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. गरजू रूग्णांनी वैद्यकीय योजनांचा लाभ घ्यावा, असेही सांगितले.
शिबिर यशस्वीतेसाठी तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष दिपक बाविस्कर, सदस्य दिपक सैंदाणै, प्रा.शशिकांत बि-हाडे, प्रदीप बाविस्कर, प्रकाश पाटील, मयुर बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गोरख पाटील, प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर बाविस्कर, दिलीप साळुंखे यांनी परीश्रम घेतले.
प्रा.शशिकांत बि-हाडे यांनी सूत्रसंचालन केले. हे शिबिर निमगव्हाण जि.प.शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले.