भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायत व डॉ. मानवतकर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 8:30 वाजेदरम्यान करण्यात आले असून हे शिबीर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य राजेंद्र चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ. निलेश महाजन, ह्दयरोग तज्ञ डॉ.राजेश मानवतकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विनोद चौधरी यांनी रूग्णांची तपासणी करत त्यांना मोफत औषधी देण्यात आल्या आहेत. या शिबिरात ५५० महिला, पुरुष व जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला आहे.
शिबिराचा लाभ घेतल्यानंतर महिलांनी मनोगत सांगितले की, गरिब परिस्थिती असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी जाऊ शकत नाही. कारण हलाखीची स्थितीमुळे जवळ पैसे उरत नाही. मात्र अशा शिबिरांचा आमच्या सारख्या गरजू लोकांना लाभ होत असतो. यामुळे आमचे रोग निदान व निरोगी होत असल्याचा आनंद असुन असे आरोग्य शिबीर नेहमी झाले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी शिबिरार्थींनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमावेळी माजी जि.प.सदस्य राजेंद्र चौधरी, उपसरपंच राजकुमार चौधरी, सदस्य नितीन भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महिला बचतगट सीआरपी वैशाली शिंदे, समाजसेवक आशिष शिंदे, मनोज यादव, ममता पगारे, शैलेश गायकवाड, कृपा महाजन, किरण सपकाळे, राजेश सपकाळे, भागवत झोपे, राजेश्री सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.