पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । “शाळा बंद …शिक्षण सुरू .. ‘ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन शिक्षणासोबतच महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने ऑफलाइन शिक्षण सुरू केले आहे. आज जागतिक साक्षरता दिनी लेले नगर येथील हनुमान मंदिर येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ऑफलाइन मोफत मार्गदर्शन वर्गास सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंदा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला .
या मार्गदर्शन वर्गात महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक शंकर भामेरे हे लेलेनगर , संतोषी माता नगर भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मोफत मार्गदर्शन करणार आहेत . या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंदा काळे यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी चेतन रोकडे यांच्या सह पालक प्रतिनिधींची उपस्थिती होती . शासन स्तरावरून शाळा सुरू करण्याचे आदेश येईपर्यंत सदर वर्ग सुरू राहणार असून परिसरातील विद्यार्थ्यांनी या वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन शंकर भामेरे यांनी केले .
त्यांच्या या उपक्रमाचे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .व्ही . घोंगडे यांच्यासह शिक्षकवृंदाने अभिनंदन केले आहे .या वर्गात कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग सह शासकिय नियमांचे पालन करण्यात येत आहे .