‘डोंगर कठोरा’ येथे निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न (व्हिडीओ)

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘डोंगर कठोरा’ येथे सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित ‘निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर’ संपन्न झाले.

आज सोमवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘डोंगर कठोरा’ येथील जिल्हा परिषदच्या शाळेजवळच्या परिसरात आयोजित या नेत्रतपासणी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशनसाठी जळगावस्थित ‘कांताई नेत्रालय’ येथे रवाना करण्यात आले. इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देऊन उपचार करण्यात आले.

‘डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या – येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १६५ नेत्र रुग्णांची तपासणी व १६ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रियासाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. या शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा आणि डॉ कुंदन फेगडे यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ सविताताई भालेराव यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे उद्धघाटन पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे, व डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून करण्यात आले

या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई भालेराव, योगेश भंगाळे डॉ.कुंदन फेगडे, नवाज तडवी (सरपंच ), धनराज पाटील (उपसरपंच ), यदुनाथ पाटील, उदय बाउसकर, माजी सरपंच कमलाकर राणे, लुकमान तडवी, नितीन भिरूड (माजी उपसरपंच ), दिलीप तायडे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे , राहुल चव्हाण, प्रवीण जावळे, उमेश कुरकुरे, प्रकाश झोपे, पिंटू राणे,अनिल लोहार, हर्षल सोनवणे रुबाब तडवी,मुस्तूफा तडवी, रवींद्र पाटील, आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सागर लोहार ,मनोज बारी, विशाल बारी ,हर्षवर्धन मोरे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

व्हिडीओ लिंक

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3117925468474320

Protected Content