Home Cities जळगाव अपंगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण

अपंगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण


3handicap logo
 

जळगाव (प्रतिनिधी) अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह सांगली येथे सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जागा मर्यादित असल्याने गरजूंनी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह सांगली यांनी केले आहे.

सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) यासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास तर मोटार ॲन्ड आर्मेचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स) व एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स) साठी किमान नववी पास आवश्यक आहे. वयोमर्यादा – 16 ते 40 वर्ष असून प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष आहे. याठिकाणी फक्त अपंग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

निवड झालेल्यांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. याठिकाणी अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा असून अनुभवी व तज्ञ निदेशकामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी/ व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेतंर्गत लाभ देण्यात येतो.

प्रवेशासाठी अर्ज अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-416410 व फोन न. 0233-2222908, मोबाईल नंबर 9922577561/ 9975375557 या पत्त्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे.. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त गरजू अपंगानी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन अधिक्षक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound