अमळनेर ईश्वर महाजन । येथील पूज्य साने गुरूजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आज महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची अनेक केंद्र आहेत त्यातून विद्यार्थी पालकाकडून अवाजवी फी घेतली जाते. परंतु अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अपवाद आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शक प्रा.एस.ओ.माळी व संचालक विजयसिंह पवार व त्यांचे मित्र कोणतेही एक रुपया फी न घेतात विनामूल्य गेल्या काही वर्षापासून मार्गदर्शन करीत आहेत. आतापर्यंत ४० ते ५० विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अधिकारी झाल्याची बाब लक्षणीय आहे.
या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी दर रविवारी पूज्य साने गुरुजी मोफत ग्रंथालय व वाचनालय या ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात. अमळनेर तालुक्यातील व इतर जवळ तालुक्यातील अनेक मुले व मुली स्पर्धा परीक्षेची केंद्रांमध्ये आपले भविष्य पूर्ण करण्याचा मानस करीत आहेत. तलाठी भरती रेल्वे भरती, जिल्हा परिषद गट क सरळसेवा भरती आदींसाठी येथे मार्गदर्शन उपलब्ध आहे. तरूणांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र संचालक विजयसिंग पवार यांनी केले आहे.