जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याला जुनी कार विकत घेतांना बनावट दस्तऐवज व बनावट नंबर प्लेट लावून ५ लाखात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जे.के.पान सेंटर येथे आला आहे. याप्रकरणी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, पियुष कमल किशोर मनियार वय २६ रा. गणेशवाडी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची संदेश चंद्रकांत काजळे रा. नाशिक यांची ओळख आल्याने तो वाहन खरेदी विक्रीचे काम करतो. संदेश काजळे याने पियुष मनियार यांना हुंदाई कंपनीचा कार (क्रमांक एमएच ०९ बीएफ ७७२७) ही विक्री असल्याचे सांगितले. त्यानुसार पियुष यांना ती कार पसंत पडली व त्यांना वाहनाचे छायांकित कागदपत्रे दाखविले व नाशिक येथे व्यवहार केल्यानंतर कार तुमच्या नावावर करून देण्याचे सांगितले. त्यानुसार पियुष कडून शहरात जे.के.पान सेंटर येथे ५ लाख रूपये घेतले. बनावट दस्तावेज आणि बनावट कागदपत्र देवून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पियुष मनियार यांनी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदेश चंद्रकांत काजळे रा. नाशिक याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल बडगुजर हे करीत आहे.