जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कंपनीचे फ्रन्चाईसी देत असल्याचे सांगून नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवत गणेश कॉलनीतील दांपत्याकडून वेळोवेळी एकुण १८ लाख ९१ हजार ५२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उत्तरप्रदेश नोएडा येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेश कॉलनीत दीपक गोपीचंद नाथांनी वय-५० हे व्यावसायिक परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम ऑनलाईन शोधत होते. त्यावेळी त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यासाठी त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशु गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार सर्व रा. नोएडा राज्य उत्तर प्रदेश यांनी त्यांच्या दोन्ही कंपनी एकत्रितपणे काम करत असल्याचे सांगितले व कंपनीची फ्रन्चाईसी देवून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत दीपक नाथाणी व त्यांची पत्नी पत्नी ज्योती दीपक नाथांनी यांच्याकडून बीपीओ कंपनीचे डेटा व्हेरिफिकेशनच्या कामाकरिता करारनामा करून देतो असे सांगितले. त्यानुसार चौघांनी डिपॉझिट व सर्व्हरसाठी एकूण १८ लाख ९१ हजार ५२ रुपये रक्कम स्वीकारली. त्यानंतर दीपक नाथाणी यांच्यासोबत कोणतीही करार केला नाही व त्यांना पैसे देखील परत केले नाहीत. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांपत्याने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिसात दहा घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार सर्व राहणार नोएडा राज्य उत्तरप्रदेश या चौघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहेत.