अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील विजय मारूती मंदीराजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम येथे मशीनला काळीपट्टी लावून एटीएम मधून २१ हजार रुपयांची रोकड काढून ग्राहकाची फसवणूक केल्याचा खळबळजनक उघडकीला आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम विजय मारुती मंदिराजवळ आहे. दरम्यान ३१ मार्च दुपारी २ ते १ एप्रिल दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन जणांनी एटीएम मशीनला काळीपट्टी लावून कस्टमरची फसवणूक होवून पैसे काढण्यासाठी लावले होते. दरम्यान त्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून कस्टमरला न मिळालेले २१ हजार रूपये काढून नेल्याचे उघाडकीला आले. या संदर्भात एटीएमचे रिजनल हेड महेश कुमार पवार यांनी बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे हे करीत आहे.