जळगाव प्रतिनिधी । पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कर्तव्यात कसून करणार्या शहर वाहतूक शाखेच्या चार पोलिस कर्मचार्यांची मुख्यालयात बदली केली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील विविध पॉईंटवर नेमण्यात आलेल्या वाहतूक कर्मचार्यांबाबत अकस्मात पडताळणी केली. त्यात प्रभात चौकातील पॉईंटवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल सुनील देविसिंग नाईंक हे तेथे आढळले नाहीत. तसेच तेथे महिला पोलिस कर्मचारीची ड्युटी असताना पुरुष कर्मचारी ड्युटी करीत असल्याचे आढळून आले. जरीना तडवी यांची नेमण्ूक असताना त्यांच्याऐवजी संघपाल तायडे हे ड्युटीवर आढळले. या कर्मचार्यांनी वरिष्ठांना पूर्वसूचना न देता स्वत:हून ड्युटीत बदल करुन घेतला होता. त्यामुळे अधीक्षकांनी सहायक फौजदार किसन श्रीखंडे, महिला पोलिस हवालदार जरीना तडवी, पोलिस नाईक संघपाल तायडे व पोलिस कॉन्स्टेबल सुनील नाईक यांची मुख्यालयात बदली केली आहे.