चोरीच्या चार गुन्ह्यांचा पर्दाफाश; चोरटे मात्र अद्याप फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव शहरासह अमळनेर, भडगाव आणि मुक्ताईनगर येथील वेगवेगळ्या चार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये चारही गुन्हे एका टोळीने केले असल्याचे समोर आले असून ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील विराम लॉन्स येथे होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी १० लाख ४१ हजार रुपये किमतीचे ९ प्रकारच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या घटनेबाबत जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह अमळनेर, मुक्ताईनगर आणि भडगाव येथील इतर तीन चोरीचे गुन्हे दाखल होते.

ही चोरी एकाच जोडीने एकाच पद्धतीने केल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक मदतीच्या आधारे मध्यप्रदेशातून या गुन्ह्यातील 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र यातील संशयित चोरटे हे फरार आहेत. पोलिस यंत्रणा या टोळीचा शोध घेत असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

Protected Content