Home राष्ट्रीय पुलवामात चकमक; चार दहशतवादी ठार

पुलवामात चकमक; चार दहशतवादी ठार

0
55

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे आज पहाटे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपुरा भागात काही दहशतवादी दडून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यावरून परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांना घेराव टाकण्यात आला. यानंतर पहाटे या भागात जोरदार चकमक झाली. यात चार दहशतवादी ठार झाले असून तिघांनी पळ काढल्याचे वृत्त आहे. याशिवाय, परिसरात अजून काही दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता असल्यामुळे जवानांनी त्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.

दरम्यान, ठार करण्यात आलेले चारही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा हा दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound