मारहाण, शिवीगाळप्रकरणी चौघांवर गुन्हा

Crime l 2

अमळनेर (प्रतिनिधी)। एक किराणा दुकानावर अनोळखी इसम पाठवून सिगारेट व बिडी बंडलची लूट करून फोनवर धमकी देण्याप्रकरणी एका गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संतोष बठेजा यांच्या ओम किराणावर 25 रोजी दुपारी 4.25 वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम आले व त्यांनी सिगारेट पाकीट, बिडी बंडल मागितले मालकाने त्याबदल्यात 1080 रुपये दिले. त्यावर त्यांनी त्यांनी एकाला भ्रमणध्वनिवरून फोन करून बोलायला सांगितले. त्यानंतर तिकडून बोलणाऱ्याने त्याचे नाव राकेश चव्हाण असे सांगून शिवीगाळ करून गोळी मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी संतोष बठेजा यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.

Add Comment

Protected Content