यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वार्यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी येथे वादळात दिनांक २६ मे रविवार रोजी रात्री साडेसात वाजता घर कोसळून चौघे जागीच ठार ठार झाले आहेत. यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची घटनास्थळी रात्रीच धाव घेतली. या कुटुंबातील चौघांचे शव हे बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
( ही बातमी आम्ही अपडेट करत असून सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत. )