Home राष्ट्रीय नक्षलवाद्यांशी चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद

नक्षलवाद्यांशी चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद


images 1

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले आहे तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या ११४ व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली. दरम्यान, जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून आपल्या प्रभाव क्षेत्रातील नागरिकांना सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत. त्यासाठी नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटण्यात येत आहेत, तसेच बॅनरबाजीही होत आहे. त्याबरोबरच नक्षलवादी या भागात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. कांकेरमधील पखांजूर येथेही नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. नक्षलवादविरोधी ऑपरेशनचे डीआयजी सुंदराज यांनी याली दुजोरा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound