शनीपेठ येथे मलिक फाऊंडेशनतर्फे फारूक शेख यांना चार पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । अब्दुल रज्जाक मलिक चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे १ फेब्रुवारी रोजी सईद मलिक यांच्या आठव्या जयंतीनिमित्त कोरोना यौद्धांचा सन्मान मलिक फाउंडेशन तर्फे शनिपेठ येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, गफ्फार मलीक, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश मामा भोळे,  उपमहापौर सूनिल खडके यांच्याहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी करीम सालार,डॉ इकबाल शाह, अमीन बादलीवाला, शिवसेना गटनेते सुनील महाजन, नितीन लड्डा, विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, विलास पाटील, मंगला पाटील, योगेश देसले  अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रामानंद जयप्रकाश, नगरसेवक कैलास सोनवणे, शाम कोगटा, चेतन संकट, शरद तायडे, इब्राहिम पटेल, गनी मेमन, डॉ. सुयोग चौधरी, डॉ.मंधार पंडित, डॉ राजेश पाटील यांची होती उपस्थिती.

मार्च ते डिसेंबर २०२० या १० महिन्यात फारूक शेख यांनी सर्वप्रथम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष म्हणून बिरादरीतर्फे कोरोना काळात गरिबांना रेषनचे किट वाटप केले, त्यानंतर कोरोनामध्ये कोविड केअर युनिटची स्थापना करून जनसंपर्क प्रमुख  म्हणून त्या मार्फत शहरात व ग्रामीण भागात वैद्यकीय शिबीर व कौटुंबिक सर्वेक्षण केले व रुग्णांना मोफत औषधोपचार दिला, रूग्ण सेवा, अंबुलन्सची सेवा सह प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन रुग्णाची सेवा दिली. दफन विधी ईदगाह व कब्रस्थानचे मानद सचिव म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत दफनविधी केला. जिल्हा मन्यार बिरादरी, मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट व  कोविड केअर युनिट यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक रित्या या १० महिन्याच्या कालावधीत कॉविडमध्ये काम करत असताना त्यांना सुद्धा कोरोना झाला असता ईश्वर कृपेने त्यावर मात करून परत सेवेत हजर झाले. 

एकाच कार्यक्रमात चार पुरस्कार प्राप्त करणारे फारुक शेख हे एकमेव  कोरोना योद्धा ठरले. त्यांच्या या विशेष कार्याची दखल अब्दुल गफ्फार मलिक यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले. फारूक शेख यांनी हे पुरस्कार सहकारी व संघटनांना समर्पित केले. पुरस्कार मानियार बिरादरी, कोविड केअर युनिट व मुस्लिम कब्रस्थान या संघटनांना व तेथील सहकारी यांना समर्पित केले.

 

 

 

 

 

 

Protected Content