माणुसकीचा झरा : बेशुध्द महिलेस पोहचवले रूग्णालयात !

यावल अय्यूब पटेल । कोरोनामुळे रक्ताची नाती सुध्दा फोल ठरत असल्याचे अनेकदा दिसून येत असतांना आज यावल मधील एक घटना ही माणुसकीचे नाते सर्वात श्रेष्ठ असल्याची प्रचिती देणारी ठरली आहे. शहरात आज एक महिला बेशुध्दावस्थेत तब्बल सहा तास पडलेली असतांना कुणी तिला मदतीसाठी पुढे आले नाही. मात्र ही माहिती मिळताच शहरातील विविध पक्षाच्या राजकीय पदाधिकार्‍यांनी त्या महिलेला रूग्णालयात दाखल केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संपुर्ण राज्य हे कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटाखाली ओढवला गेला असतांना प्रत्येक व्यक्ति हे कोणत्यानी कोणत्या भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. यातच तालुक्यातील कोळवद येधील रहिवासी असणारी ६५ वर्षे वयाची एक महीला ही संजय गांधी निराधार योजने चे पैसे जळगाव जनता सहकारी बँकेत घेण्यासाठी आली होती. मात्र ती अचानक बँकेच्या बाहेर समोरील एका दुकानाच्या ओटयावर बेशुद्ध अवस्थेत पडली.

शहरातील प्रमुख बाजारपेठ व वर्दळीचे हे परिसर असतांना देखील ही महीला कोण ती अशा अवस्थेत का पडली आहे अशी साधी विचारपुस देखील कुणी केली नाही. अखेर सहा ते सात तासानंतर यावल येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर हे त्या मार्गाने जात असतांना सदरची महीला दिसुन आली. चेतन अढळकर यांनी माणुकीसचे दर्शन घडवित तात्काळ् संपर्कातील मंडळींना फोन करून तात्काळ वृद्ध महीलेस उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालयात कसे पाठवता येईल यासाठी प्रयत्न केले.

सदरची महीला कोळवद येथील राहणारी असल्याने अढळकर यांनी भाजपाचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल गोवींदा पाटील यांच्याशी आणी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्याशी संपर्क साधल्याने दोघ ही तात्काळ हजर झाले. त्यांनी ऑटो रिक्शा बोलवुन वृद्ध महीलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वेद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला व परिचारिका प्रियंका महाजन यांनी त्वरीत दखल घेत उपचारास सुरूवात केली. उशीरा पर्यंत त्या महीले कोरोना चाचणी  केली असता ती पॉझीटीव्ह असल्याने त्या महीलेस जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. 

संबंधीत महीलेस जर तात्काळ वेळेवर उपचार मिळाले नसते किंवा ती रात्रभर त्याच ओटयावर बेवारस म्हणुन पडुन राहीली असती तर ती जिवंत राहीली नसती. मात्र चेतन अढळकर, हर्षल पाटील आणि उमेश फेगडे यांनी माणसुकीचे दर्शन घडविल्यामुळे आता त्या महिलेस उपचार मिळणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून या तिन्ही मान्यवरांचे कौतुक करण्यात येत आहे.

 

Protected Content