जळगाव – शहरातील मध्यवर्ती भागात लवकरच मदर चाइल्ड हेल्थ हॉस्पिटल उपक्रमांतर्गत चाळीस कोटींचे नवजात केअर युनिट हॉस्पिटल (एसएनसीयू) व पेडियाट्रिक ओपीडी असलेले अद्ययावत रुग्णालय मंजूर झाले असून या रुग्णालयातून प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर महिला व नवजात शिशुसाठी उपचार मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांची भेट घेऊन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अश्विनी कुमार चौबे याची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, ग्रामीण रुग्णालय धरणगाव, ग्रामीण रुग्णालय एरंडोल, पारोळा येथील ग्रामीण रूग्णालयासाठी १.२5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक प्रादेशिक रुग्णालयासाठी निधी आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत पाचोरा येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहे. आणि लोकसभा मतदार संघातील दोन नवीन यूपीएचसी केंद्र मंजूर करण्यात यावेत अशी विनंती केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एक रुग्णालय
सध्या कोरोना महामारीच्या साथीच्या परिस्थितीने समाजात आरोग्य सुविधांची अधिक गरज भासत आहे. अशा प्रसंग निभावून नेता यावा याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० खाटांच्या क्षमतेच्या प्रत्येक संसर्गजन्य रोग रुग्णालये स्थापन करा आणि हा पथदर्शी प्रकल्प सर्व जिल्ह्यात चालवावा. त्याची सुरुवात माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून करावी अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कडे केली आहे.
जिल्हावासियांमधे उत्सुकता
शहरातील मध्यवर्ती भागात लवकरच मदर चाइल्ड हेल्थ हॉस्पिटल उपक्रमांतर्गत चाळीस कोटींचे नवजात केअर युनिट हॉस्पिटल (एसएनसीयू) व पेडियाट्रिक ओपीडी असलेले अद्ययावत रुग्णालय मंजूर झाले असून या रुग्णालयातून प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर महिला व नवजात शिशुसाठी उपचार मिळणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असुन 40 कोटींचे नवीन रुग्णालयाची जिल्हावासियांमधे उत्सुकता लागली आहे.