Home प्रशासन यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांची शरद पवार गटाला सोडचिट्ठी !

यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांची शरद पवार गटाला सोडचिट्ठी !


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील नगर परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांना पाठविलेल्या सदस्यपदाच्या राजीनामा पत्रात यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधरे कोलते यांनी म्हटले आहे की आपण आपल्या खाजगी कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे .
आगामी काळात राज्यात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषद च्या निवडणुक पार्श्वभुमीवर राकेश कोलते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

दरम्यान लवकरच आपण आपल्या मित्र परिवाराशी विचार विनिमय करून पुढील वाटचाल ठरविणार असल्याचे राकेश कोलते यांनी लाईव्ह ट्रेडस न्यूजशी बोलतांना सांगीतले .


Protected Content

Play sound