मंगरूळ माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी प्रा.संदीप नेरकर यांचा सत्कार

amalner 1

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरुळ येथील दादासाहेब अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.संदीप नेरकर हे नुकतेच भौतिक शास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.यानिमित्त त्यांचा विद्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला.

 

जेव्हा एखादा शाळेचा विद्यार्थी एखाद्या विषयात प्रवीण्य मिळवतो, तेव्हा त्या शाळेचा नावलौकीक होऊन मुख्याध्यापक व शिक्षकांची छाती अभिमानाने फुलून जाते. असेच अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील दादासाहेब अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयात प्रा. संदीप नेरकर यांनी भौतिक शास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना पीएचडीसाठी फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. संदीप नेरकर यांनी आतापर्यंत अनेक विषयांवर व्याख्याने झाली आहेत. विविध विषयात त्यांचा परिपूर्ण अभ्यास विषयांवर पकड आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपक्रमशील शिक्षक संजय पाटील राजेंद्र पाटील,व शिक्षक व बंधू आणि भगिनी यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Add Comment

Protected Content