दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले आहेत. 92 वर्षीय सिंह यांचे 26 डिसेंबरला एम्स रूग्णालयात निधन झाले आहे. दरम्यान आज निगम बोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शीख धर्मीय संस्कारांनुसार त्यांना मुखाग्नी देण्यात आला. मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर, मोठी मुलगी उपिंदर सिंग (६५), दुसरी मुलगी दमन सिंग (६१) आणि तिसरी मुलगी अमृत सिंग (५८) निगम घाटावर उपस्थित होते. या कुटुंबाने पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. मुलीने मुखाग्नी दिला.
अंत्यसंस्काराच्या वेळीही मनमोहन सिंग यांना निळी पगडी घातली होती. फेंट निळा हा मनमोहन यांचा आवडता रंग आहे आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या दिवसांची आठवण करून द्यायचा, म्हणूनच ते नेहमी निळा पगडी घालत असत. लष्कराच्या तोफखाना वाहनातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले होते. राहुल गांधी मृतदेहासोबत गाडीत बसले होते. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घाटावर उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मनमोहन यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.