माजी नौदल प्रमुख रामदास यांनी मोदींचा दावा फेटाळला

former Navy chief Admiral L Ramdas

 

रायगड (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर ‘टॅक्सी’सारखा केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता अॅडमिरल (सेवानिवृत्त) एल. रामदास हे उतरले असून त्यांनी तपशीलवार माहिती देत मोदींचा दावा फेटाळून लावला आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी आपल्या घरी पत्रकारांना माहिती दिली.

 

माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आरोपांचे खंडन केले असून त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लक्षद्वीप बेटावर राजीव गांधी हे बेट विकासाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याच्यासोबत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी उपस्थित होते. इतर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, राजीव गांधी यांनी लक्षद्वीपच्या खासगी दौऱ्यासाठी १० दिवस विराट युद्धनौकेचा वापर केला होता. या दौऱ्यात राजीव यांच्यासह त्यांच्या व पत्नी सोनिया यांच्या कुटुंबातील सदस्यही होते, असा जो दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे, तो इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टच्या आधारे करण्यात आला असावा अशी शक्यता देखील रामदास यांनी व्यक्त केली. दरम्यान, चबरोबर सेनेला राजकारणात ओढू नये, असे निवडणूक आयोगाला कळविले असल्याचेही माहिती यावेळी श्री. रामदास यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content