मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे. पांडे हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी वर्सोवा मधून निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेक काळापासून ते सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी उत्सुक होते. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी लोकसभा निवडणूकीमध्येही तसा प्रयत्न केला होता पण तेव्हा हे होऊ शकले नाही पण आता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पांडे लोकसभेला मुंबईत उत्तर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार होते. लोकांचा त्यासाठी आग्रह होता असेही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पांडे यांना जून २०२२ मध्ये केंद्रीय एजन्सींनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना ठाकरे मविआ च्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.