Home Cities चोपडा माजी आमदार वळवी यांचा चोपडा मतदार संघात संपर्कास प्रारंभ

माजी आमदार वळवी यांचा चोपडा मतदार संघात संपर्कास प्रारंभ


208d8c68 a6fa 44e1 85fe a3c6f3535f3f

चोपड़ा, प्रतिनिधी | तालुक्याचे  माजी आमदार जगदीश वळवी यानी नुकताच तालुक्यातील तापीकाठावरील गावांचा संपर्क दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दोंदवाडे, तांदलवाडी, खाचने, कुरवेल, तावसे आदी गावात जावून प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. या सर्व तापी काठच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला.

 

यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. भरत पाटील, राजेन्द्र भाटिया, पत्रकार शाम जाधव हे उपस्थित होते. प्रारंभी दोंदवाडे गावात संपर्क दौऱ्यावेळी उपसरपंच मनोज युवराज पाटील, लक्ष्मण नत्थू पाटील, जगतराव महारू पाटील, युवराज शालिक पाटील, देवीदास फकीरा,गणेश जगदीश पाटील, हिम्मत यशवंत पाटील, किशोर झिपरु पाटील, प्रकाश अशोक पाटील, सुकदेव बाबूराव कोळी, हीरालाल शिवजी कोळी, ज्ञानेश्वर कोळी, तुळशीराम महारू कोळी, रमेश गन्धेर भील, लालसिंग सुकलाल पावरा, सदाशिव वेडु पाटील, रमेश रामकृष्ण पाटील, जिजाबराव पाटील, गणेश यशवंत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, तांदलवाडी येथील धनराज पोपट पाटील, आधार यादव पाटील, सुनिल गयभु पाटील, राजेन्द्र वसंत धनगर, प्रवीण मूलचंद, जगन शंकर पाटील, दीपक आधार पाटील, खाचने येथील संजय नामदेव पाटील, वाल्मीक सुरेश पाटील, संदीप दत्तात्रय पाटील, प्रदीप विठ्ठल पाटील, हीरालाल आत्माराम पाटील, बंसीलाल ताराचंद धीवर, गुलाब बलिराम पाटील, हिम्मत गोपीचंद पाटील, भावलाल काशीनाथ पाटील, पुंजू कुशाल पाटील, जावरू नागराज पाटील, प्रदीप मछिन्द्र पाटील, भगवान दगड़ू मोतिराले, रमेश गंगाराम धीवर, देवेंद्र गगाराम धीवर, प्रशांत अशोक पाटील, पांडुरंग नामदेव पाटील, रविंद्र गंगाराम सूर्यवंशी, महेन्द्र आत्माराम सूर्यवंशी, अधिकार पाटील आदी ग्रामस्थ हजर होते. त्यांच्या दौऱ्याची सांगता कुरवेल येथे करण्यात आली. यावेळी कुरवेल येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेवून वाळवी यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.


Protected Content

Play sound