रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील माजी आमदार मनिष जैन यांच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून गरीब व गरजू नागरीकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
रावेर तालुक्यात अचानक माजी आमदार मनिष जैन यांचे दौरे वाढल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आगामी २०२४ ची विधानसभा लढण्यासाठीच जैन आतापासून सक्रीय झाल्याचे काही राजकीय जानकारांचे मत आहे. तर माझा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात जिवा-भावाचे कार्यकर्ते असून त्यांनी रक्तदान शिबिर किराणा किट्स वाटप करण्यासाठी बोलविले म्हणून यावे लागत असल्याचे श्री जैन सांगत आहे.
माजी आमदार मनिष जैन यांच्या सक्रियतेला प्रमुख कारण म्हणजे हाजी गफ्फार मलिक तीन महीने पूर्वी सक्रीय होऊन २०१४ मध्ये मिळालेले ३५ हजार मते तर दूसरे प्रमुख कारण म्हणजे अनिल चौधरी दोन वर्ष आधी सक्रीय होऊन २०१९ मध्ये मिळालेले ४५ हजार मते यामुळे हा मतदारसंघ प्रत्येक टर्मला बाहेरील व्यक्तीकडे आकर्षिक होतोय म्हणून कदाचित माजी आमदार मनिष जैन तीन वर्ष आधिपासून सक्रीय झालेले दिसत असल्याचे मत रावेरच्या काही पत्रकारांचे आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून माजी आमदार मनीष जैन रावेर भागात सर्वात जास्त दौरे आहे. रक्तदान शिबिरला उपस्थिती देणे हातवर पोट असणाऱ्याना किराणा किट्स वाटप करणे काही पेशंट संदर्भात जळगावात त्यांना मदत करणे जन-संपर्क वाढविणे यावर जैन यांचा भर दिसतोय मागील महिन्यात रावेर तालुक्यातील सर्व पक्षातील काही मोजके राजकीय शिलेदारांची जळगावात बैठक सुध्दा घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.