अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यात सन २०२१-२२ या वर्षात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रशासनाला पत्रव्यवहारव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की १२ मे २०२० च्या महसूल व वन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे अमळनेर तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर वार्षिक पर्जन्यमान ६७०.७१ मी. मीटर असून जून ते सप्टेंबर या खरीप हंगामातील जून – ११४.८३, जुलै-१८५.६१,ऑगस्ट – १७३.९२ आणि सप्टेंबर-११४.६४ असे एकूण ५८९.०० मी.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असून चालू खरीप हंगातील जून ११४.८३ आणि जुलै- १८५.६१ असे एकूण ३००.४४ मी.मी. अपेक्षित पर्जन्यमानापैकी १० जून -११४.८३ मी. मी. पैकी ४१.५० मी.मी. आणि १२ जुलै अखेर १८५.६१ मी.मी. पैकी फक्त ९.५३ मी.मी. म्हणजेच आज अपेक्षीत कालावधीत
अमळनेर तालुक्यात सरासरी पर्जन्यमान फक्त ५१.३ मी.मी. एवढेच असून एकूण सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पीक परिस्थितीनुसार विपरीत परिणाम होवून पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून दुष्काळ सदृश्य स्थिती (दुष्काळाची प्रथम कळ) निर्माण झाली आहे.याची दखल घेऊन अमळनेर तालुक्यात १२ जुलै,२०२१ अखेरच्या या कालावधीत दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ पर्जन्यमान खंडीत झाल्यामुळे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७०.७१ मी.मी. पैकी ५१.०३ मी.मी. एवढे अंत्यत कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असल्याने (Trigger-१) शेतकरी बांधवांचे खते, बियाणांचे विपरित नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. कृपया त्यास्तव या दुष्काळ सदृश्य स्थितीवर उपाय योजनांसाठी शासन स्तरावरुन संबधित विभाग प्रमुखांना योग्य त्या कार्यवाहीच्या सुचना व्हाव्यात यासाठी सूचना करण्याची विनंती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.या निवेदनाच्या प्रति नामदार गुलाबराव पाटील,मंत्री- पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा., ना.दादा भुसे,मंत्री- कृषि- महाराष्ट्र राज्य,अनिलदादा पाटील आमदार – अमळनेर,विभागीय आयुक्त नाशिक विभाग, जिल्हाधिकारी जळगाव,
उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर, तहसिलदार अमळनेर यांना पाठविण्यात आल्या आहेत.