पाचोरा प्रतिनिधी । शहरातील बाहेरपुरा भागातील रसूल नगर भागातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडी सेलचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जावेद शेख (वय -३४) यांचे दि. ३० डिसेंबर दुपारी दोन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा (दि. ३१ रोजी) सकाळी ९ वाजता राहते घर रसुल नगरमधून निघणार आहे.
बाहेरपुरा भागातील नूर मस्जिद मध्ये त्यांचेवर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाचोरा शहरातील प्रथम मुस्लिम शिवसैनिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केल्याने त्यांना ‘जावेद सेना’ नावाने ख्याती मिळाली होती. आमदार किशोर पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याने त्यांना सन – २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मिळालेल्या उमेदवारी मिळवून त्यांनी चुरशीची लढत दिली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. जावेद शेख यांचे अकस्मात निधनाने संपूर्ण शिवसेनेत व परिसरात शोककळा पसरली आहे.