Home Cities जळगाव माजी उपमहापौर कुलभुषण पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

माजी उपमहापौर कुलभुषण पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आज २५ ऑक्टोबर शुक्रवार रोजी माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज केला. कुलभूषण पाटील हे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर असून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य आहे.

या मतदारसंघातून माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना शिवसेना उबाठा पक्षाने एबी फॉर्म दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मातोश्रीवर जयश्रीताई महाजन यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांची पती तथा माझी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी त्यांच्या वतीने एबी फॉर्म स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या किंवा येत्या काही दिवसात अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात येईल.

तसेच भारतीय जनता पक्षातर्फे राजूमामा भोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजूमामा भोळे २८ ऑक्टोबर सोमवार रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. परंतू माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.


Protected Content

Play sound