Home Cities जळगाव माजी नगरसेवक पिंटू उर्फ विनोद सपकाळे यांचे निधन

माजी नगरसेवक पिंटू उर्फ विनोद सपकाळे यांचे निधन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विनोद प्रभाकर सपकाळे (उर्फ पिंटू) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनोद सपकाळे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या अचानक निधनामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ते प्रभाग क्रमांक १ मधील भाजपच्या नगरसेविका रिटा सपकाळे यांचे पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांचे पार्थिव जळगाव येथे आणण्यात येणार असून उद्या सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound