यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आदीच आर्थीक संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या कृर्षीपंपावरील संपुर्ण वीज बील तात्काळ माफ करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने सावदा तालुका रावेर येथील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सावदा तालुका रावेर येथील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांना याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष व डोंगर कठोरा येथिल रहीवासी सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र सरोदे,उपाध्यक्ष अमित सरोदे,तालुका अध्यक्ष आशिष बोरोले,जिल्हा संपर्क प्रमुख नितिन जाधव यांनी महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता यांची भेट घेवुन निवेदन देऊन सदरची मागणी केली आहे. राज्याचे उर्जामंत्री ना . नितीन राऊत यांना लिहलेल्या लेखी निवेदनात शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती कोरोना महामारी,अचानक झालेली अतिवृष्टी,वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे तिहेरी संकटात ओढले गेलेले शेतकरी बांधवांची परिस्थिती अतिशय नाजुक झालेली आहे. या दृष्टीकोणातुन शासनाने त्यांचे कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करावे तसेच कृषिपंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे.