यावल ( प्रतिनिधी) येथील सामाजीक वनीकरण विभागात कार्यरत असलेले वनपाल डी.बी. तडवी (दगडु दादा) हे आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर १ जून २०१९ रोजी सेवानिवृत्त होत आहे.
डी.बी. तडवी मुळचे यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहीवासी असून त्यांनी दिनांक १ मार्च १९८३ पासुन दहिगाव तालुका यावल येथून वनरक्षक या पदावरून आपल्या शासकीय सेवेचा प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी तिन वर्ष चोपडा, एक वर्ष मुक्ताईनगर येथे सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी ३४ वर्ष यावलच्या सामाजीक वनीकरण विभागात वनपाल या पदावर कार्य केले. यावेळी डी .बी. तडवी यांना २००४ या वर्षात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या अभियानात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाच्या वतीने सन्मानपत्र आणि दोन वेतनवाढ मिळाले होते. डी.बी. तडवी यांच्या प्रर्दीघ सेवेचा उद्या शेवटाचा दिवस असून त्यांना सामाजीक वनीकरणच्या माध्यमातुन सन्मानपुर्वक निरोप दिला जाणार आहे.