Home क्राईम सातपुड्यात कर्तव्यावर जाताना वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

सातपुड्यात कर्तव्यावर जाताना वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुड्यात कर्तव्यावर जात असताना दुचाकी अपघातात वनरक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लेदा सिताराम पावरा (वय ३४, रा. तिरड्या ता. रावेर) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ तारखेला दुपारी सुमारे चार वाजता वैजापूर मुख्यालयातून कर्तव्यावर जाण्यासाठी ते दुचाकीने खऱ्यापाडाकडे निघाले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैजापूर-खऱ्यापाडा रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागला.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात डॉ. सपना पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहातील शीतपेटीत ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लेदा पावरा यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन लहान मुले असा परिवार आहे. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे वनविभाग व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound