रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वन विभागाने मोरवाल परिसरात डिंक तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत ३३ किलो ओला डिंक आणि एक मोटारसायकल जप्त केली. या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मोरवाल परिसरातील कं. नं. ११ मध्ये गस्त घालण्यात येत होती. यावेळी एका व्यक्तीला मोटारसायकलवर गोण्या घेऊन जाताना पाहण्यात आले. पथकाने पाठलाग केल्यानंतर आरोपीने वाहन व मुद्देमाल जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तपासणी दरम्यान, त्या गोण्यांमध्ये ३३ किलो धावडा ओला डिंक आढळून आला. जप्त केलेल्या डिंकाची अंदाजे किंमत ६,६०० रुपये, तर मोटारसायकल (MP 12 MI 2764) ची किंमत २८,००० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. एकूण जप्त मुद्देमाल ३४,६०० रुपये किमतीचा आहे.
ही कारवाई निनू सोमराज (वनसंरक्षक, धुळे प्रा. वनवृत्त धुळे), जमीर शेख (उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव), आर. आर. सदगीर (विभागीय वन अधिकारी, दक्षता, धुळे) तसेच समाधान पाटील (सहा. वनसंरक्षक, यावल वन विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत अजय बावणे (वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर), अरविंद धोबी (वनपाल, सहस्त्रलिंग राऊंड), जगदीश जगदाळे (वनरक्षक, जुनोना), आयेशा पिंजारी (वनरक्षक, अहिरवाडी), सविता वाघ (वनरक्षक, पाडले खु.), सुभाष माळी (वनमजूर), इनुस तडवी (वाहनचालक विनोद पाटील) आणि पेसा विशेष वनरक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जप्त केलेला मुद्देमाल आगार डेपो, रावेर येथे जमा करण्यात आला असून, पुढील तपास वन विभाग करत आहे. डिंक तस्करी रोखण्यासाठी अशा कारवायांना गती देण्याची मागणी होत आहे.