वन खात्यातर्फे मेंढपाळांवर कारवाई

mendhpal

रावेर प्रतिनिधी । रावेर वनक्षेत्र हद्दीत अनधिकृत वन चराई करणार्‍या पाच मेंढपाळांवर वन खात्याने कारवाई करून दंड ठोठावला आहे.

या बाबत वृत्त असे की वनक्षेत्रात मोठ्या वृक्ष लागवड सुरु असून नैसर्गिक गवत व रोपे सुध्दा उगत आहेत. परंतु अवैध चराई मुळे वन विभाग हैराण झालेला आहे. या अनुषंगाने वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शना खाली अवैध चराई करणार्‍यांवर कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. वनपाल अतुल तायडे,अरविंद धोबी,संजय भदाने,वनरक्षक संभाजी सूर्यवंशी, बडगणे सोपान यांनी सामूहिकरीत्य वनहद्दीत अवैध वनचराई विरुध्द कारवाई करत आहेत. या अनुषंगाने पाच मेंढपाळांवर कारवाई करून १०९ मेंढयांचा कळप जप्त करण्यात आला असून त्यांच्या कडून ५४ हजार ५०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Protected Content