Home Cities अमळनेर चाकूचा धाक दाखवत बियरची बाटली जबरी हिसकावली; एकावर गुन्हा दाखल

चाकूचा धाक दाखवत बियरची बाटली जबरी हिसकावली; एकावर गुन्हा दाखल

0
40


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील शहद हेमो कलाली रोडवरील हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक दाखवत बियरची बाटली नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नंदलाल रामचंद्र पाजेवाणी (वय-६५) रा. दादावाडी समोर अमळनेर यांचे अमळनेर शहरातील शहीद हेमो कलाली रोडवर हॉटेल आराम परमिट रूम आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दादू एकनाथ निकुंभ रा. पारधीवाडा अमळनेर याने नंदलाल पाजेवाणी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत २०० रूपये किंमतीची बियर जबरीघेतली.  आणि मी परत येतो दुकान बंद करून नको अशी धमकी देवून गेला. याप्रकरणी नंदलाल पाजेवाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादू निकुंभ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.


Protected Content

Play sound