चाळीसगाव शहरात प्रथमच नारी सप्ताहाचे आयोजन

a1f57bf8 6e05 4042 b3c7 73a9b8e88b56

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील युगंधरा फाउंडेशन,देवरे फाउंडेशन,स्त्री रोग संघटना आणि रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच ‘नारी सप्ताह २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दि ३ मार्च रोजी चला धावू या स्पर्धा व ८ मार्च रोजी रणरागिणी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.४ मार्च ते ७ मार्च या कालावधीत तालुक्यातील टाकळी प्र.दे.,शिरसगांव,पाटणा आणि चितेगांव या ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य,स्वावलंबन,सरंक्षण व कायदेविषयक माहीती स्पष्ट व्हावी म्हणून अनेक विविध व्याख्यान व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. एका पत्रकार परिषदेत नुकतीच याबाबत माहिती देण्यात आलीय.

 

 

दि.३ मार्च रोजी होत असलेल्या चला धावू या मॅरेथॉन स्पर्धेचे सलग दुसरे वर्ष असून सकाळी ६ वाजता स्पर्धेस सुरुवात होणार आहेचाळीसगाव न्यायाधीश अनिता गिरडकर व महाराष्ट्र स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.रोहीणी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सदर मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलिस कवायत मैदान,शिवाजी चौक,भडगांव रोड,सिग्नल पॉईंट मार्गे पोलिस कवायत मैदानावर रॅलीची सांगता होणार आहे.

 

 

दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्यपर तालुक्यातील अनेकविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा.साधना निकम,सिस्टर लिजी,सरला साळुंखे,राधा पाडवी,सीमा पाटील,कविता बागूल,कावेरी पाटील,कुसुमावती पाटील,निलीमा हिवराळे,स्नेहा सोनवणे या महिलांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रा.सरोज जगताप (निफाड) आणि विजयालक्ष्मी आहेर (मालेगांव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नारी सप्ताह २०१९ या संपूर्ण कार्यक्रमाची पंचसुत्री व समारोप प्रा.डॉ.अस्मिता पाटील (जळगांव) यांच्या हस्ते होणार आहे

Add Comment

Protected Content