चोपड्यात प्रथमच सार्वजनिक ट्रस्टतर्फे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन

mangoes

चोपडा ( प्रतिनिधी ) येथील चोपडा पिपल्स को ऑफ बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टतर्फे शुक्रवारी भव्य आंबा महोत्सव पिपल्स बँकांच्या शेजारी हॉलला सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. या सेंद्रिय आंबा महोत्सवाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार असून त्यांच्या सोबत रत्नागिरी येथील प्रगतशील शेतकरी राजेश पालेकर हे उपस्थित राहणार आहेत.

 

येथील चोपडा पिपल्स को ऑफ बँक लि. सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वाने शेतकरी ते ग्राहकांचे दुवा म्हणून सार्वजनिक सेवा ट्रस्टने पुढाकार घेऊन सेंद्रिय आंबा महोत्सवाचे (एक्सपोर्ट क्वालिटीचे ) आयोजन केले आहे. या आंबा महोत्सवाचा फायदा सर्वांना घेता यावा आणि ग्रामिण भागातील जनतेला रत्नागिरी / देवगढ येथील हापूस आंबा घेता यावा, या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात येत आहे. आंबा महोत्सव सुरू होण्याआधीच मोठ्या प्रमाणावर बुकींग सुरू झाली असलायची माहिती सार्वजनिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी दिली आहे. या महोत्सवात रत्नागिरीचे प्रगतशील शेतकरी राजेश पालेकर, राहुल मणियार (जळगाव), हे खास करून उपस्थित राहणार आहेत. तरी या आंबा महोत्सवाचे सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, ट्रस्टी वसंतकाका गुजराथी, आशीषभाई गुजराथी, प्रविण भाई गुजराथी, सुनील जैन, प्रफुल्ल गुजराथी, विकास गुजराथी, शिरीष गुजराथी आदिंनी केले आहे.

Add Comment

Protected Content