सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ खड्डे पडले आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने, आंदोलने, निदर्शने व मोर्चा काढण्यात आला. परंतू त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेवून ५ ऑक्टोबर पर्यंत करण्याचे सांगण्यात आले होते. तरी देखील याचे काम न झाल्याने ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी १७ ऑक्टोबर पासून अन्नत्याग उपोषणाला सुरूवात करण्यात येणार आहे. याबाबत सावदा पोलीसांना निवेदनही देण्यात आले.
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, बन्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील फैजपूर ते रावेर पर्यंत असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबाबत आंदोलन केले होते. त्यानंतर सावदा येथील विश्रामगृह येथे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदास, आ.शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे नही चे कार्यकारी अभियंता गायकवाड व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता व्हि. के तायडे व ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांची बैठक झाली होती.
त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आपण या महामार्गाची देखभाल दुरुस्ती व सावदा हद्दीमध्ये झालेल्या रस्त्याच्या दुभाजकाची दुरुस्ती न झाल्यास आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असे आम्ही तुम्हाला सुचित केले होते. त्या अनुषंगाने आपल्या खात्यामार्फत व ठेकेदारामार्फत कोणतीही उपाययोजना त्वरित होताना दिसत नसल्याने व होणारे काम चांगल्या प्रतीचे होत नसल्याने आम्ही ताप्ती सातपुडा जर्नलिस्टचे पदाधिकारी व सदस्य सावदा बस स्थानकासमोर मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी ११ वाजता अन्नत्याग उपोषणास बसणार आहे याबाबत निवेदन देण्यात आले ओह.