जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याच्या अंतर्गत गरजूंना अन्नदान करण्यात आले.
आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिंप्राळ्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले. यासोबत शहरात ठिकठिकाणी गरजूंना अन्नदान करण्यात आले. नगरसेवक चेतन संकत, सचिन पाटील, ऍड. दिलीप पोकळे, हर्षल मावळे, कुंदन काळे, उमेश सोनवणे, अमजद खान आदींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यात रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक परिसर आदींसा शहरातील विविध भागांमध्ये अन्नदान करण्यात आले.