जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी शिवारात शेतात अचानक आग लागल्याने चारा जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकलाल जुलाल पाटील (वय-54, रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव) हे शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी 19 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास खेडी शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या ज्वारीच्या चाराला अचानक आग लागल्याने २० हजार रुपये किमतीचे चारा जळून खाक झाला आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुकलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मिलिंद सोनवणे करीत आहे.