जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव विमानतळावर न्यू फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून जळगावच्या लौकीकात भर पडणार असल्याचे सांगत खासदार पाटील यांनी यासाठी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिह पुरी, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण चेअरमन यांच्या मार्गदर्शनातून जळगाव विमानतळाची न्यू फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर साठी निवड झाल्याने जळगाव विमानतळ जगाच्या नकाशावर आले असून जिल्ह्याच्या वैभवात हे सेंटर निश्चितच भर घालणार असून जळगाव विमानतळ नॅशनल न्यू फ्लाईंग ट्रेनिंगचे नवे जंक्शन म्हणून उदयास येईल असा विश्वास खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे..
आज पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रात देशात नव्याने सुरू करण्यात असलेले सहा न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पैकी एक प्रक्षिक्षण संस्था जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे. पायलट ट्रेनिंग देणार्या दोनच संस्था देशात असून त्यात रायबरेली येथे सर्वात आधी फ्लाईंग ट्रेनिंग देणारे इग्रो देशातील पहिले फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात गोंदिया येथे अशा प्रकारचे फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते मात्र नवीन ट्रेनिंग सेंटर ची गरज पाहता पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमान प्राधिकरणाने नवीन सहा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भवीष्यात देण्याचा मानस व्यक्त केला असून यात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आल्याने जळगाव जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. या माध्यमातून खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात यावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे
नाईट लँडिंग सुविधेसह परिपूर्ण जळगाव विमानतळ
जळगाव विमानतळावरून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या प्रयत्नातून नाईट लँडिंग सुविधा साकरण्यासाठी मोठा निधि प्राप्त झाला होता. ५० कोटी रुपयांची कामे गेल्या वर्षभरात विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी खर्च करण्यात आले आहे.या विमानतळावर सध्याचे स्थितीत अहमदाबाद,मुंबई या विमान फेर्या सुरू असून या विमानतळाच्या माध्यमातून नव्याने उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आल्याने भविष्यात या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून जळगाव विमानतळ जगाच्या कानाकोपर्यापर्यंत जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणार आहे.
देशात सहा नवीन उड्डाण प्रशिक्षण संस्था
देशात बेलगावी, खजुराहो ,कलबुर्गी, लीलाबरी, सालेम या पाच विमानतळासोबत सहावे जळगाव विमानतळ वरून नवीन फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू करण्याचा मानस व्यक्त केला असून पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून जारी केलेल्या पत्रकात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आल्याने लवकरच येथून नवीन पायलट देशसेवेसाठी बाहेर पडणार आहे. जळगाव विमानतळ नैशनल न्यू फ्लाइंग ट्रेनिंगचे नवे जंक्शन होणार असल्याचा आनंद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिह पुरी, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण चेअरमन अरविंद सिंग यांचे आभार मानतो अशी भावना खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.