Home क्राईम काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार


श्रीनगर (वृत्तसंस्था) काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

केल्लम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. भारतीय जवानानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. लष्काराच्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असून आणखी एक ते दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound