Home क्राईम काश्मीरमध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांचा खात्मा


Indian Army
 

श्रीनगर (प्रतिनिधी) जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा येथील लस्सीपोरा येथे झालेल्या चकमकीत ४ दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून ४ एके रायफली जप्त करण्यात आल्या आहेत. या परिसरात सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

 

सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा भागात गुरुवारी संध्याकाळी शोधमोहीम राबवली जात असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शुक्रवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या प्रादेशिक सेनेच्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound