यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांनी राष्ट्रीय ध्वजास परेडची सलामी देण्यात आली. याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, आदीवासी प्रकल्यस्तरीय नियोजन आढावा समितीच्या जिल्हाध्यक्ष मिना तडवी, नगर परिषदच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह शासकीय सेवेतील महिला कर्मचारी यांची उपस्थिती लक्ष वेधणारी असून, याचबरोबर नगरसेवक प्रा. मुकेश येवले, काँग्रेसचे प्रभाकर सोनवणे, मा. आ. रमेश चौधरी, मा.नगरसेवक हाजी ईकबाल खान, कॉंग्रेस जेष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान, पुंडलीक बारी, भाजपाचे किशोर कुलकर्णी, संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, शिवसेने मुन्ना पाटील, संतोष धोबी, जगदीश कवडीवाले ,शरद कोळी, उज्जैनसिंग राजपुत, भगतसिंग पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष हेमराज फेगडे, मा.न. उमेश फेगडे यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध राजकीय पक्षाचे पदधिकारी, शासकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.
यावल आदीवासी प्रकल्प कार्यालयात ध्वजारोहण यावेळी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आदीवासी प्रकल्यस्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्ष मिना तडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अलका ठाकरे, जावेद ईस्माईल तडवी, स्वाती सुर्यवंशी, आदीवासी निरिक्षक अविनाश शिवरामे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते.
यावल नगर परिषदच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक असलम शेख नबी, अभीमन्यु चौधरी, देवयानी महाजन, कल्पना वाणी, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, शिला सोनवणे, रेखा चौधरी, दिपक बेहडे, समीर शेख, मनोहर सोनवणे यांच्यासह न.पा. कार्यकारी आदी उपस्थितीत होते.